जय श्रीराम!
#बहुमंदिरेस्थापियेली
आपण बघत आहोत श्री महाराज स्थापित मंदिरे
३१. अंबामातामंदिर, गोंदवले १९११
गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र
श्रीदत्तांच्या एका बाजूस नृसिंहाची मूर्ती व एका बाजूस देवीची मूर्ती आहे. १९५९ च्या पुण्यतिथी उत्सवाच्या वेळी शतचंडी महायाग करण्यात आला व दत्तमंदिरात देवीची स्थापना करण्यात आली.
३२. कुरवली (सिद्धेश्वर) राममंदिर १९१२ कुरोली
मु.पो. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव, जि. सातारा - ४१५५२७, महाराष्ट्र
प. पू. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या शिष्यनामावलीतील महत्वाचे पण तसे अपरीचित नाव म्हणजे श्री संत दामोदर महाराज.आज त्यांची पुण्यतिथी. श्री दामोदर महाराजांनी २४ वर्ष गोंदवल्यात प. पू. श्री. महाराजांची सेवा केली. श्रीमहाराजांनी त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला होता. श्रीमहाराज म्हणायचें कीं जो नियमित नामस्मरण करील त्यांची अंगलट गुरुसारखी होईल. श्री दामोदरबुवा कुरवलीकर हे सुद्धा अगदी श्रीमहाराजांसारखेच दिसायचें. बेळगांव निवासी पू काणेमहाराज यांना अनुग्रह दामोदरबुआंनीच दिला होता. श्री महाराजांच्याच आज्ञेवरून त्यांनी गोमेवाडी आणि सिद्धेश्वर कुरोली येथे प्रभू श्री रामरायांची स्थापना केली. पू. श्री गोंदावलेकर महाराजांसोबत काशी अयोध्या यात्रेत सहभागी होण्याचे भाग्य त्यांना लाभले. महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवात काकडआरती नंतरच्या भजनाचे प्रमुख कुरवलीकर बुवाच असायचे.
३३. दहिवडी राममंदिर १९१२
मु.पो. दहिवडी, ता. माण, जि. सातारा, ४१५५०३, महाराष्ट्र
जय श्रीराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा