जय श्रीराम!
पाऊलखुणा - ३
१) भीमराव गाडगोळी :
ते नावाजलेले वकील होते. भीमरावांना श्रीमहाराजांनी पत्र लिहिले ' आता तीन तपे वकिली झाली आहे तेंव्हा ती बंद करून उरलेले जीवन भगवंतासाठी आहे हे समजून रहावे. ' ज्या दिवशी हे पत्र श्री भीमरावांना मिळाले त्याच दिवशी त्यानी वकिली बंद केली . विशेष म्हणजे त्या दिवशीच्या तारखेसाठी देखील कोर्टात गेले नाहीत !
एकदा श्री.भीमराव गाडगुळी महाराजांना ( पेटीवर ) म्हणाले, *"आपण जे काकांना (श्री.ब्रह्मानंदांना) दिले ते मला द्या."*त्यावर श्रीमहाराज म्हणाले, " एका माणसाला त्याचा मित्र स्टेशनवर पोचवायला गेला होता.तो माणूस डब्याच्या दारात उभे राहून मित्राला डब्यात बोलावीत होता,तेव्हा मित्र म्हणाला, *"अरे तु बाजुला हो की,तू बाजूला झाल्या खेरीज मी आत कसा येणार ?तसे तुम्ही आपला 'मी' बाजूला केल्या खेरीज मला आंत कसे येता येईल.?"*हा ' मी 'नाहीसा करुन मला आत जागा करुन द्या मी त्याचीच वाट पाहतो.
२) श्री दामोदरबुवा कुरवलीकर

वैशाख शु.अष्टमी. श्रीगोंदावलेकर महाराजांचे जेष्ठ शिष्य श्रीदामोदरबुवा कुरवलीकर [ कुरोली, सिद्धेश्वर, तालुका खटाव] यांची पुण्यतिथी. त्यांनी श्रीमहाराजांची २४ वर्षे निकट राहून सेवा केली. श्रीमहाराजांनी त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला होता. श्रीमहाराज म्हणायचें कीं जो नियमित नामस्मरण करील त्यांची अंगलट गुरुसारखी होईल. श्री दामोदरबुवा कुरवलीकर हे सुद्धा अगदी श्रीमहाराजांसारखेच दिसायचें. महाराजांनी त्यांना अनुग्रहाचा अधिकार दिला होता. बेळगांव निवासी पू काणेमहाराज यांना अनुग्रह दामोदरबुआंनीच दिला होता.
महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवात काकड आरती नंतरच्या भजनाचे प्रमुख कुरवलीकर बुवा असायचे.
![]() |
| श्रीमहाराजांसारखे दिसणारे पु. कुरोलीकर बुवा |
जय श्रीराम!
~ श्रीमहाराजकन्या



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा