जय श्रीराम!
पाऊलखुणा - ८
बहू मंदिरें स्थापिलीं धन्य कीर्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥
"बहुमंदिरे स्थापियेली" हि लिस्ट आपल्या श्रीमहाराजांच्या ऑफिशियल वेबसाईट वर उपलब्ध आहे. आता आपण पाहूया, या शृंखले अंतर्गत श्रीमहाराजांनी स्थापन केलेली/ त्यांच्या प्रेरणेने शिष्यांनी स्थापन केलेली मंदिरे. त्यांचे स्थापनावर्षा नुसार उपलब्ध माहिती बघूया. ज्यांचे फोटो फोटो गुगल किंवा इतरत्र वेबसाईट वरून मिळाले ते घेतले आहेत. तसेच त्या त्या मंदिराविषयी उपलब्ध कथा/ पार्श्वभूमी ही देत आहे. तब्बल ६६ मंदिरांची लिस्ट उपलब्ध आहे. . अजूनही श्रींच्या प्रेरणेने बांधलेली अजूनही मंदिरे असतील. लिस्ट अपडेट होत जाईल.
श्रीगोंदवलेकरमहाराजांनी स्वतः स्थापन केलेली राममंदिरे/मंदिरे
१. थोरले राममंदिर, गोंदवले (इ.स. १८९१-९२)-- गोंदवले, ता. माण, जिल्हा. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र.jpeg)



![]()
![]()
श्रीमहाराजांनी गोंदवले येथे स्थापन केलेले पहिले ‘थोरले राममंदिर.’ या मंदिरातच श्रीमहाराजांचे वास्तव्य झाले. या मंदिरात ‘काशी विश्वनाथ’ मंदिर आहे. श्रीमहाराजांचे शेजघर आहे. गोंदवले संस्थानने १९९२ साली या मंदिराचा जीर्णोद्धार आणि शताब्दी महोत्सव साजरा केला. या मंदिरातील मारुतीची मूर्ती श्रीमहाराजांनी स्वहस्ते बनवून स्थापन केली आहे. “माझ्या रामाला एकदा डोळे भरून पाहा” असे महाराज सांगत असत. तोच हा राम थोरले मंदिरातला.
थोरल्या राम मंदिर तसे सर्वश्रुत आहेच. या रामाच्या डोळ्यातून तीन वेळा अश्रुपात झाला. गोपाळराव मोकाशी हे थोरले महाराजांचे चुलत मावस भाऊ या रामाचे पुजारी होते व रामरायाचे डोळ्यातून ३वेळा अश्रू आले त्यावेळी गोपाळराव हजर होते.
अजून काही विशेष ठळक बाबी या राम मंदिराबद्दल आहेत त्या अश्या:
१) श्रीमहाराजांचा दात थोरल्या रामरायाच्या पायाशी आठवण म्हणून पुरुन ठेवला आहे. श्री गोपाळ लक्ष्मण मोकाशी हे मूळ कलेढोणचे, श्रींचे चुलत मामेभाऊ . कलेढोण हे गीतामाईंचे माहेर. मॕट्रिक झाल्यावर गोपाळराव मामलेदार म्हणून नोकरीस लागले. गोपाळरावांची पूजा श्रीना खूप आवडायची म्हणून गीताबाईंनी त्यांना व दादोजींना गोंदवलेस बोलावून घेतले. गीतामाईंनी श्री गोपाळराव व श्री दादाजी मोकाशी यांना व श्रांना गोंदवलेस परत आणणेसाठी त्यांना इंदूरला पाठवले. त्याप्रमाणे ते श्रींना घेऊन गोंदवलेस आले. नंतर श्रींनी गोपाळराव यांस नोकरी सोडण्यास सांगितले व आपले मिळकतीचे गोपाळराव यास कुलमुखत्यार नेमले. परिणामी श्रींचे जमिनीबाबत सर्व व्यवहार गोपाळराव पाहू लागले. त्यामुळे समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळाली.
गोपाळरावांकडे श्रींचा एक पडलेला दात होता. तो त्यांनी नंतर रामरायाचे पायाचे अंगठ्याजवळ खोदून बसविला व त्यावर चुना सिमेंट लावले त्यामुळे श्रींचे वास्तव्य आजही दाताचे रुपाने थोरले राममंदिरात आहे.
संदर्भः चैतन्य स्मरण २००५ मधील ना बा अत्रे यांच्या लेखातून
२) थोरल्या राम मंदिरात डावीकडे ठेवलेला कोच श्रींच्या वेळेपासून तिथेच आहे. त्यामुळे तिथे बसून जप केल्यास वेगळीच अनुभूती येते. त्या कोचाबद्दल कथा वाचनात आली ती अशी. श्रीब्रह्मचैतन्य महाराजांच्या पहिल्या पुण्यतिथी वेळेस श्री ब्रह्मानंदबुवा गोंदवल्यास आले होते. राम मंदिरात उत्सवाची तयारी सुरु होती. थोरल्या रामाच्या बाजूला श्रीमहाराजांचा कोच ठेवला आहे.[जो अजुनही तसाच ठेवला आहे.] तेथे अप्पासाहेब भडगावकर कुणाशी तरी बोलत उभे होते. बोलता बोलता ते त्या कोच्यावर किंचितसे बसले व टेकणार तेवढ्यात ब्रह्मानंदबुवांचे तिकडे लक्ष गेले. त्यांनी एक शिवी देऊन 'उठ तेथून उठ' म्हटले.अप्पासाहेब गडबडून उभे झाले.[ब्रह्मानंदबुवा आणि अप्पासाहेबांचा अपार स्नेह होता. त्यामुळे त्यांच्यात प्रेमाने शिव्या देणे वगैरे होत असे] पण आता ब्रह्मानंदांनी चांगलेच खडसावल्याने ते गडबडून गेले. ब्रह्मानंदबुवा अप्पासाहेबांच्या जवळ आले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले 'अरे कुठे बसतो आहेस? जळून गेला असता त्यांच्या तेजाने.' सत्पुरुषाचे स्थान त्याच्या अस्तित्वाने एवढे भारलेले असते की तेथे सामान्य व्यक्ती अनवधनाने जरी बसला तरी त्यास ते तेज सहन होणार नाही.

३) थोरले रामाच्या समोरच उजवीकडे असलेल्या खांबाला टेकून महाराज प्रवचन करीत. त्यामुळे कित्येक भाविक त्या खांबाला कवेत घेतात किंवा पाठ लावतात, त्याने पाठदुखी बरी होते असा लोकांचा समज आहे.
४) थोरल्या राममंदिरातील मारुती बद्दल अशी कथा श्रींच्या चरित्रात आहे कि, एका एकादशीला श्रींना दम्याचा खूप त्रास होत असल्याने ते खोलीत बसले होते. रात्री नऊ वाजता रामापूढे कोणीतरी भजन करीत होते. त्याच्याकडे लक्ष जाऊन, "अरे हा भजन म्हणतो आहे का रडतो आहे?" असे म्हणून ते स्वतः उठले आणि भजनाला उभे राहिले. लगेच पुष्कळ मंडळी जमा झाली. भजनाला रंग चढू लागला आणि श्रीमहाराज एखादया तरूणाप्रमाणे रामापूढे नाचू लागले. पंधरा मिनिटांपूर्वी त्यांना दम लागला होता हे कोणास कसे खरे वाटणार? नाचत-नाचत ते मारूतीजवळ आले आणि मंडळीना म्हणाले, "भगवंताला भजनाची फार आवड आहे. त्याचप्रमाणे त्याच्या भक्तांनादेखील भजनाची फार आवड असते. आपण रामासमोर भजन करूं लागलो की, मारूतीरायाला स्फुरण चढून तो देखील नाचायला लागतो. बघा, आज तो पखवाज वाजवीत आहे!"
श्रींनी मंडळीना मारूतीच्या पायापाशीं कान लावण्यास सांगितले. बहूतेक सर्व स्त्री-पुरुषांनी तेथे कान लावून पाहिले. प्रत्येकाला मृदुंग वाजविण्याचा ध्वनी ऐकू आला.
५) पिशाच्च बाधित व्यक्तीला थोरले राममंदिरात जो मारुती आहे त्याच्या बाजूच्या खांबाला टेकून/ बांधत असत आणि समोर श्रीमहाराज कोचावर बसून त्याच्याशी बोलत असत. आणी त्या पिशाच्चस मुक्ती देत.
६) श्रीमहाराजांना भेटायला मध्यरात्री सूक्ष्मात्मे येत. याची एक गंमतीदार गोष्ट वाचनात आली ती अशी की, महाराजांच्या स्वयंपाकघरातील गंगुताई आठवले या थोरले राममंदिरात शेजघराच्या समोर असलेल्या रामाच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत झोपत असत. श्रीमहाराजांनी त्यांना अनेक वेळा सांगून पाहिले कि इथे झोपू नका. मला रात्री माणसे भेटायला येतात. गंगुताईंना वाटले, लोक जातील दुसऱ्या बाजूने. त्यांना रस्त्यात अडथळा येतो. त्यांनीही एक दोनदा ऐकले ना ऐकल्यासारखे केले. दुसरीकडे झोपून पाहिले. आणि परत नेहमीच्या जागेवर झोपल्या. दुसरे दिवशी जरा उशिरा जाग आल्यावर पाहतात तो त्या थोरले रामाच्या समोर त्यांचे अंथरूण. त्यांना मोठे नवल वाटले, असे कसे झाले? थोडे संभ्रमातच श्रींना विचारायला गेल्या तेव्हा श्री हसत म्हणाले, तुम्हाला सांगितले होते तिथे झोपू नका. रात्री त्या लोकांनी तुमचे अंथरूण तिकडे नेले असणार, अडथळा आल्यामुळे. कोण लोक हे विचारताच , श्री म्हणाले कि सूक्ष्मात्मे त्यांचा अडचणी विचारण्याकरता मध्यरात्री येत असतात. हे ऐकून घाबरून त्यांनी विचारले ," म्हणजे पिशाच्चाचा स्पर्श मला झाला? आता सचैल स्नान करावे लागणार. तेव्हा महाराज उत्तरले, " घाबरू नका, ते आत्मे असले तरी फार वरच्या स्तरावरचे आहेत.
तेव्हापासून गंगुताईंनी झोपण्याची जागा बदलली.
(संदर्भ: श्री चैतन्य सहस्रबुद्धे यांचे 'अन्नब्रम्ह ' हे पुस्तक )
*****
२. आटपाडी दत्तमंदिर, आटपाडी (इ.स. १८९२)
ब्राह्मणगल्ली, आटपाडी - जि. सांगली, ४१५३०१, महाराष्ट्र


आटपाडी हे गाव म्हणजे श्रीमहाराजांची सासुरवाडी. तेथील श्री बापूसाहेब देशपांडे हे श्रीमहाराजांचे श्वशुर. आटपाडी गावातील दत्तमंदिर श्री विष्णुपंत कात्रे यांनी बांधले. विष्णुपंत सरकारी नोकर असले तरी मोठे विरक्त गृहस्थ होते. त्यांना दत्ताच्या उपासनेची आवड होती म्हणून नोकरी सोडून देऊन ते माधुकरी मागू लागले व आपला काळ उपासनेमध्ये घालवू लागले. श्रीमहाराजांनी त्यांना दत्तोपासना दिली होती.
संदर्भ: के. व्ही. बेलसरे लिखित महाराजांचे चरित्र 

*****
३. धाकटे राममंदिर, गोंदवले (इ.स. १८९४-९५)
- गोंदवले, ता. माण, जिल्हा. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्

गोंदवले येथे महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्यांच्या संख्येत बरीच वाढ झाली होती. शिवाय बाहेर गावाहून येणाऱ्यांना श्रीमहाराज गोंदवल्यात ठेवून घेत असत. त्यामुळे थोरले राममंदिराची जागा अपुरी पडू लागली. सहकुटुंब येणाऱ्यांसाठी म्हणून मग त्यावेळी धाकटे राममंदिर बांधले. सोयीसाठी तेथे काही खोल्या बांधल्या.
धाकट्या राममंदिराविषयी एक अतिशय गोड आठवण उपलब्ध आहे. ती म्हणजे धाकट्या राममंदिरात पांडुरंगबुवांचा विवाह
तेंव्हा आनंदसागर यांनी आपल्या मातोश्रींना हा विचार थोरल्या महाराजांच्या [म्हणजेच गोंदवलेकर महाराजांच्या] कानावर घालण्यास सांगितले.
साखरखेर्ड्याच्या प्रल्हादांचा विवाह मेहकरला होता. त्यासाठी पांडुरंगबुवा दमणीने चालले होते पण त्याच वेळी थोरल्या महाराजांचे पत्र आले की - 'पत्र पाहताच गोंदवल्यास निघून येणे.' प्रल्हादांच्या लग्नाच्या अक्षता टाकून मग गोंदवल्यास जावे हा विचार करुन पाडुरंगबुवा निघाले. पण वाटेत विजांचा कडकडाट होऊन धुवाधार पाऊस पडू लागला. एक विजेचा लोळ जमिनीवर जवळून पडताना त्याची झळ लागून बरोबरचा गडी बेशुद्ध पडला. तो पुढे सावध झाला. पण पांडुरंगबुवा मनाशी समजले, की श्रींची म्हणजे थोरल्या महाराजांची इच्छा मी लग्नास जावे अशी दिसत नाही. ते बरोबरच्या माणसांना लग्नास पाठवून स्वतः गोंदवल्यास आले.
श्रीरामापुढे 'श्री' कोचावर बसले होते. पाडुरंगबुवांनी थोरल्या महाराजांना साष्टांग नमस्कारा केला. तेंव्हा 'श्री' उपरोधाने म्हणाले - 'तुम्हालाच आम्ही नमस्कार केला पाहिजे कारण आपण ब्रह्मचारी व आम्ही प्रापंचिक - ब्रह्मचारी तेवढे तरून जातात व गृहस्थाश्रमी नरकात जातात, त्यातून आम्ही दोन विवाह केले, आता काय होणार कोणाय ठाऊक?' तेंव्हा पांडूरंगबुवांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तेवढ्यात थोरले महाराज म्हणाले, 'लग्न करता काय?' तेंव्हा पांडुरंगबुवा म्हणाले,'गुरुपाशी खोटे बोलू नये, पण मनात इच्छा आहे, ब्रह्मचारी राहावे.'
मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रतेक भक्ताला चार दिवस आधीपासूनच थोरले महाराज सांगत की -'आनंदसागरांच्या कन्येचा मार्गशीर्ष वद्य पंचमीस धाकटे राम मंदिरात विवाह आहे सर्वांनी अक्षता टाकण्यास यायचे बरं का ?' फक्त एवढेच, मात्र नवरदेव कोण आहे हा मात्र सर्वांना प्रश्न पडत असे. प्रत्यक्ष मार्गशीर्ष कृ.५ शके १८३२ [सन १९१०] रोजी धाकट्या रामासमोर पांडुरंगबुवांचे लग्न थोरल्या महाराजांनी चि.सौ. कां. कृष्णाबाईंशी मोठ्या थाटाने लावून दिले. ते स्वतः नवरदेवाच्या पाठीशी उभे राहिले. काही दिवस नवदांपत्यास प्रेमाने आपल्या जवळ ठेऊन घेतले. पुढे उपासना वाढविण्याचा आदेश देऊन जालना येथील राममंदिरात पाठविले. पांडुरंगबुवांना श्रींची तीव्रतेने आठवण व्हायची गोंदवल्यास जावे असे वाटे. मग त्यांनी गुरुपौर्णिमेस गोंदवल्यास जाण्याचा नियम केला. मात्र रामनवमीचा उत्सव जालन्यास व दासनवमीचा उत्सव मंगळूर येथे सुरु केला.
धाकट्या रामाच्या संदर्भात श्री गोंदवलेकर महाराज यांचे एक श्रेष्ठ शिष्य पांडुरंगबुवा [उर्फ रामानंद महाराज] यांच्या विवाहाची ही एक गोड आठवण.
*
संदर्भःचैतन्य स्मरण २००२ मधील श्री विनायकराव धानोरकर यांचा लेख
संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन
आणखी एक आठवण 'जी महाराज' या पुस्तकात आलेली आहे. ती म्हणजे, श्रीमहाराजांनी देह ठेवण्यापूर्वी भाऊसाहेबांना आज्ञा केली होती कि ते गेल्यावर १२ वर्षे गोंदवले इथे वास्तव्य करावे. श्रीमहाराजांनंतर लोकांचे तेथे येणे जाणे बरेच कमी झाले. धाकट्या राम मंदिराच्या मागच्या भागात खोल्या काढल्या होत्या. तेथे भाऊसाहेब कुटुंबासह राहात होते. नित्यनेमानुसार ते दररोज दुपारी बारा वाजता अनवाणी पायांनी श्रीमहाराजांना नैवेद्य घेऊन समाधी मंदिरात जात असे. उन्हात पायांना चटके फार बसत.
जय श्रीराम!
~ संकलन महाराज कन्या




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा