सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

 जय श्रीराम!

'बहु मंदिरे स्थापीयेली', या श्रृंखलेअंतर्गत आपण ओळीने वर्षानुसार श्रीमहाराज स्थापित विविध मंदिरे तसेच त्यांच्या आज्ञेने त्यांच्या शिष्यांनी स्थापन केलेली मंदिरे अभ्यासत आहोत, तसेच त्या त्या ठिकाणी घडलेल्या आणि श्रीमहाराज चरित्रात उल्लेख आलेल्या घटना प्रसंग, बघत आहोत.
यात पुढची मंदिरे खालीलप्रमाणे:
*****
२०.  दत्तमंदिर, सातारा १९०८
१८६, रामाचा गोट, सातारा - ४१५००२, महाराष्ट्र


गोविंदशास्त्री पुराणिक यांनी श्रींच्या आज्ञेने हे मंदिर बांधले आणि चालवले.
*****
 

 

 

 

 





 

 

 

 

 

 

 

 

 

 ****

२१.  हुबळी राममंदिर, १९०९
सी.बी.टी. समोर, हुबळी - ५८००२०, कर्नाटक

श्रीमहाराजांकडून अनुग्रह प्राप्त झालेले श्री दत्तोपंत तबीब आणि चिदंबर नाईक करी यांनी हुबळी किल्ला येथे उमामहेश्वर मंदिरात श्रीराम सीता लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती श्रीं पावन हस्ते स्थापन केल्या. हे उमामहेश्वर मंदिर चिदंबर स्वामी यांनी स्थापन केले होते. हे मंदिर आकर्षक असून येथे पुराण, प्रवचन, भजन निरंतर सुरु असते. 

हुबळी येथील रामस्थापनेच्या वेळी झालेली गोष्ट मागच्या लेखात येऊन गेलीच आहे.
 याच वर्षी मुंबईहून परत गोंदवल्यास आल्यावर बर्‍याच मंडळींनी घेऊन श्रीमहाराज हुबळीला गेले. दर्शनाला खूप गर्दी झाली म्हणून तबीबांनी श्रींना दिवाणखान्यातून वरच्या मजल्यावर खोलीत बसवले व सेवेला मनुष्य दिला. खोलीतील कोनाड्यात लावलेली मेणबत्ती श्रींनी पंख्याने विझवली व पुन्हा खाली दिवाणखान्यात येऊन बसले. श्री आलेले पाहून मंडळींना खूप आनंद झाला. रात्री ११ पर्यंत सर्वांनी श्रींचे दर्शन घेतले. 

रामाच्या स्थापनेच्या आदल्या दिवशी श्री मंदिरात जाण्यासाठी निघाले व कोणाला नकळत जानकीबाईंच्या घरी गेले. (जानकीबाई भाऊसाहेब केतकर गदगला असताना त्यांच्याकडे  स्वयंपाकाला होती. भाऊसाहेबांनी पेन्शन घेतल्यावर ही ७५ वर्षांची बाई हुबळीला येऊन राहिलो.) श्री तिच्याकडे गेल्यावर म्हणाले. "जानकीबाई, कालपासून मला ताप आहे, बुरकुल्यात थोडा मऊ भात शिजवा व आमसुलाचे सार करुन खायला घाला." तिने लगेचच सार भात केला व आपल्या हाताने भरवला. श्री तेथून निघताना जानकी त्यांच्या पाया पडली. दोघांच्याही डोळ्यांत पाणी आले. श्री म्हणाले, " माय, तुमची जबाबदारी माझ्याकडे लागली. होईल तेवढे नाम घ्या. राम आपले प्रेम तुम्हाला दिल्यावाचून राहणार नाही. शांत आनंदात रहा." श्रीराम मंदिराची स्थापना झाल्यावर खूप अन्नदान झाले. श्री सिद्धारुढ स्वामी यांचे श्रींना आमंत्रण आले. मठात गेल्यावर दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. श्रींनी काही सांगावे अशी स्वामींनी विनंती केली. त्यावर श्री म्हणाले, " भगवंताचे अखंड स्मरण राखावे" हीच स्वामींची आज्ञा आहे अशी माझी खात्री आहे हे स्मरण राखण्याचा तुम्ही प्रयत्न करावा; हे जो करील त्याच्या हाताला धरुन स्वामी तुम्हाला भगवंतापर्यंत पोचवतील. ही मी हमी देतो. हे ऐकल्यावर स्वामी एकदम उद्धारले, "साधु साधु !! वा वा फार छान" त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. स्वामींनी आपला मठ व बांधून ठेवलेली समाधी श्रींना दाखवली. पुढे हुबळीला एक दिवस राहून श्री गोंदवल्यास आले





 

 

 

 

 

 

 

 

***
२२.  कुर्तकोटी राममंदिर, १९०९
कुर्तकोटी, जि. गदग, कर्नाटक

या मंदिराबद्दल मागे उल्लेख येउन गेला आहे.
कुर्तकोटी येथे महाभागवत यांच्या भाऊबंदांच्या मालकीचे गौरीशंकर मंदिर होते. १९०८ मधे श्रीमहाभागवत यांच्या आमंत्रणनुसार श्री महाराज कुर्तकोटी येथे आले होते तेव्हा काशीबाईंच्या याच गौरीशंकर मंदिरात चातुर्मासाचे चार महिने राहिले होते. त्यावेळी या मंदिरात श्रींनी स्वहस्ते राम लक्ष्मण सीतेच्या मूर्तीची स्थापना केली होती.तेव्हापासून हे राम मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.
***



 

 

 

 

 

 

 

 

 

जय श्रीराम!
संकलन - श्रीमहाराज कन्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...