बुधवार, २६ मार्च, २०२५

 जय श्रीराम! 

आजपासून आपण अभ्यासुया 

#श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे

१. विठ्ठलमंदिर, नरगुंद १९०९

दंडापूर मेन रोड, नरगुंद, जि. गदग - ५८२२०७, कर्नाटक


जय श्रीराम! 

श्रीब्रम्हानंद बुवांनी अद्भूत प्रमाणावर एकंदर तीन नामजपयज्ञ केले.त्यांतील नरगुंदचा जपयज्ञ पहिला. 

श्रीब्रम्हानंद बुवां नेहमी खेडोपाडीं देखील संचार करीत असतं.असेच हिंडत हिंडत ते एकदां नरगुंद गावी गेले.या गावी श्रीब्रम्हानंद बुवांचा भक्तपरिवार मोठा होता.त्यामुळे नरगुंद गांवी त्यांची फेरी वरचेवर होत असे.नरगुंद हे तालुक्यांतील पेट्याचे गांव.संस्थानी अमदानींत हे राजधानीचे गांव होते.तेथील राजे ब्राम्हण होते.त्यांची धर्मावर श्रध्दा होती.जेथील राजा ब्राह्मणा तेथिल राजधानीचे गांवी बहुसंख्य ब्राह्मणवस्ति असावयाचीच.त्या नियमाने येथेही ब्राह्मणवस्ति भरपूर होती.आणि या सर्वाची श्रीब्रम्हानंद बुवांवर फार भक्ति होती.

आपले गांवी श्रीब्रम्हानंद बुवां आल्याची बातमी पसरतांच तेथील सर्व भाविक भक्त त्यांच्या दर्शनास जमले.एके दिवशी दुपारचे जेवण चालले असतां श्रीब्रम्हानंद बुवांनी सहज बोलता बोलता,  "तेरा कोटी जप सुरु करावा म्हणतो.त्यासाठी तुम्ही सर्वजण बेलधडीला येणार ना ?"असे म्हटले. तें ऐकून सर्वांनी एकजुटीने " घरदार सोडून ४/६ महिने बेलधडीस येण्यास आम्हाला कसे शक्य आहे,यासाठी जप येथेच केल्यास ठीक होईल. आम्ही सर्वजण आपल्या आज्ञेप्रमाणे त्यांत भाग घेण्यास व इतर कामे करण्यास तयार आहो." असे विनयपूर्वक सुचविले.

ते ऐकून,श्रीब्रम्हानंद बुवां हसले व "पाहू या.श्रीसद्गुरु नाथांना विचारु या.त्यांची परवानगी मिळाल्यास तुमच्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे येथेंच करु या " असे म्हटले.

त्यावेळी तात्काळ श्रींच्या अनुज्ञैसाठी येथून पत्र लिहावे असा आग्रह धरला. श्रीरामाविषयींच्या त्या ग्रामस्थांच्या मनांतील आस्तिकभाव पाहून पु. बुवा संतुष्ट झाले व त्याच दिवशी तेरा कोटी जपयज्ञास श्रीमहाराजांची अनुज्ञा मिळविण्याविषयी आपल्या नेहमीच्या शिरस्त्यास अनुसरुन श्रीब्रम्हानंद बुवांनी पंढरपुरचे श्रींचे परमभक्त अप्पासाहेब भडगांवकर यांस पत्र लिहिले.

श्रीमहाराजांकडून ब्रह्मानंद बुवांना आलेले आज्ञापत्र अत्यंत मार्मिक,हृदयंगम व बोधप्रद आहे.

ते पु. बुवांच्या कानडी चरित्रकारांना उपलब्ध झाले असल्यानें व त्यांनी ते छापले असल्याने त्यांच्या अनुज्ञेने ते जसेंच्या तसेंच वाचकवृंदांस सादर करीत आहे.

"श्रीरामचंद्रपरायण ब्रह्मानंद योगी यांस.

ब्रह्मचैतन्यबुवा मु.!! इंदूर यांचा अनेक आशीर्वाद.पत्र लिहिणेचे कारण आपला तेरा कोटी जपाबद्दलचा मजकूर अप्पासाहेब यांचे मार्फत कळला.तरी लिहिल्याप्रमाणे हरीपूर येथे करण्यास सुरवात करावी.जरुर जरुर मी काशीहून परत हर्दे मुक्कामी येऊन येथे रामनवमीला श्रीरामाची स्थापना केली व आतां नैमीष्यारण्यांत जाण्याचा विचार आहे. आपल्यास कळवावे.आणि ज्या ठिकाणी तेरा कोटीची सोय असेल त्या ठिकाणी करावां. कृष्णातीर बरे आहे.परंतु आतांचे दिवस घोर कलीचे असल्यामुळे चांगले सत्कर्म कोणतेही शेवटास जाऊं न देण्याबद्दल कलीचा दुराग्रह आहे.तरी त्याचा प्रयत्न न चालण्याचा उपाय तपोबल पाहिजे. शब्दज्ञान,व जगाचे महत्व व निंदा ही दोन्ही उपयोगाची नाहीत.तर तशाचा सहवास करु नये.नास्तिक कुतर्काशीं वाद न करता अहंभाव रहित व्यवहाराचा संबंध न ठेवता,अक्रोध,निर्लोभ,चित्तांत वृत्ति लीन करुन, उपासनारुप जग पहावे.अखंड नाम स्वतः घ्यावे हे आपले कर्तव्य आहे.मी आपणास सांगावे असे नाही.पण सुचनार्थ लिहिले आहे.दुसरे असे.मन चित्तवृत्ति बाह्य नामस्मरण झाल्यावाचून साधनात आळस करुं नये तसेच स्त्रियांचे मुखावलोकन,त्यांचे शब्द,स्पर्श, भाषण,ममत्व,अगत्य,इ.कधी सत्य मानू नये व त्याचे वारे कधी लागूं देऊ नये.असे १३ कोटी होईतोपर्यंत करावे.माझी विनंति आहे.कारण काळ फार भयंकर आहे.तर माझ्या चालीने चालू नका.माझे वेळ काळ कारण वेगळे आहे.तथापि मी अन्य अवस्थीच राहणार अथवा देह सोडणार.कारण आता पुढे धर्म,दया,शांति,भक्ति,नीति कोठे आढळत नाही.सबब सांगून वागा.राम राम अखंड जागा.हा आशिर्वाद."

या प्रमाणे आलेले सद्गुरुनाथाचे आज्ञापत्र पाहून ब्रह्मानंद गुरुंचा आनंद ओसडू लागला.सद्गुरुनाथांच्या आज्ञापत्राप्रमाणे नदी तटाकीं जपयज्ञ करावयाचे श्रीगुरुंच्या मनांत येऊ लागले.नरगुंदला नदी तटाक नसल्याने दुसरे कार्यस्थळ पाहण्याची त्यांस पाळी आली.परंतु नरगुंद येथील भक्त जनांचा नामयज्ञाबाबतचा परम भाव उत्साह पाहून व श्रीमहाराजांच्या "ज्या ठिकाणी १३ कोटीची सोय असेल त्या ठिकाणी करावा " या आदेशाचा आधार घेऊन श्रीगुरुंनी नरगुंदांतच जपयज्ञ करणेचा निश्चय केला.

नरगुंदगावी एक भव्य असे श्री विठ्ठल मंदिर आहे. या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार ब्रम्हानंद बुवांनी केला. तेथेच सगळ्या भाविकांच्या मनांतून जपयज्ञ व्हावा असे असल्याने श्रीशालिवाहन शके १९२३ प्लवनाम संवत्सराच्या आषाढ शुध्द अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत श्रीरामनाम सप्ताहाचा आरंभ करण्यांत आला.आसपासच्या चहूंकडील भाविकांना आमंत्रणे गेली. भाविकांच्या मेळ्यांत सप्ताह थाटाने चालूं राहिला.श्रीगुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रींच्या पादुकांना पंचामृताभिषेक करुन पूजा थाटाने करुन आरती करण्यांत आली.त्या नंतर तेरा कोटी जपाचा संकल्प करण्यांत येऊन सद्गुरु नाथांपुढे श्रीफल ठेवण्यांत आले व त्याच शुभमुहूर्तावर श्रींच्या आज्ञेप्रमाणे ब्रह्मानंद गुरुंनी स्वतः प्रथम जपास प्रारंभ केला.

जपास बसणाऱ्या अनुग्रहित लोकांना जपाचा नियम समजावून सांगण्यासाठी व परगांवहून जपासाठी येऊन राहणाऱ्या लोकांच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी म्हणून सुरवातीस एकदोन महिने श्रीगुरुंनी आपला मुक्काम तेथेंच ठेवला. त्यामुळे श्रीक्षेत्र बेलधडी येथील राममंदिरात दररोज काकड आरती,माध्यान्ह नैवेद्य, आरती,सायंभजन आरति अष्टावधान वगैरे प्रकारांनी भगवंताची उपासना ज्या क्रमाने चालते त्याच प्रमाणे चांगल्या रीतीने सुरवात झाली.

या विठ्ठलमंदिरांत रोज शेकड्याने स्त्री,पुरुष,मुले जपाला बसत असत.त्या सगळ्या ंच्या जेवणाची व्यवस्था श्रीगुरुच करीत होते.उत्तरोत्तर जपासाठी येणाऱ्यां लोकांची संख्या वाढू लागली.त्यामुळे अवघ्या ६/७ महिन्यांतच तेरा कोटीची जपसंख्या पुरी होत आली. जपसंख्या आटोक्यांत येताच ब्रह्मानंद गुरुंनीजपयज्ञाच्या सांगता महोत्सवासाठी श्रींना विनंतीपूर्वक बोलावून आणण्यासाठी नरगुंदच्या दोघा भाविकांची रवानगी केली व आपण महोत्सवाच्या तयारीस प्रारंभ केला.


श्रीमहाराजांस आमंत्रण देण्यास गेलेले भाविक ज्यावेळी गोंदवल्यास गेले त्यावेळी श्रीमहाराज भाविकांच्या मेळाव्यांत विराजमान झालेले त्यांस दिसले. श्रीमहाराजांच्या चरणकमलाला भक्तिभावपूर्वक साष्टांग नमस्कार करुन त्यांनी श्रीगुरुंची विज्ञापना त्यांस कळविली . ते ऐकून श्रीमहाराजांनी आपल्यास झालेला संतोष व्यक्त केला व निघण्यासंबधीची आपली संमती दर्शविली. आज निघूं या,उद्या निघूं अशी चाल ढकल करीत पुढे सुमारे दोन महिन्यांनी श्रींनी शेकडो शिष्य परिवारा समवेत तेथून प्रयाण केले.

जपयज्ञाच्या सांगतामहोत्सवास श्रीं येणार असल्याची वार्ता यावेळपावेंतों कर्नाटका च्या कानाकोपऱ्यात पसरली होती.त्यामुळे महिनाभर आधीपासून सुमारे हजार एक लोक जमून राहिले होते.श्री आल्यावर तर जनसमूह ८/१० हजारपर्यंत फुगला असावा.

श्रीमहाराज गोंदवल्याहून निघाले ते पंढरपूर, सोलापूर,विजापूर यामार्गे मल्लापूर स्टेशनवर उतरले. तेथे आगाऊ तयार ठेवण्यात बैलगाडींतुन यावगलला गेले

नंतर बैलगाडीतूनच प्रवास करीत नरगुंदला जाऊन पोचलें.भाविक भक्तांनी उत्साहपूर्वक सर्व गांव तोरणांनी आधींच सजविले होते.रस्त्यावरील धुरळा उडूं नये म्हणून गावांतील रस्त्यावर पाणी शिंपडून ठेवले होते.व त्यावर रांगोळी घालून रस्ते सुशोभित केले होते, श्रींना समारंभांने वाजत गाजत आणण्यासाठी भाविक भक्त भजनीमेळ्यासह गांवाबाहेर एक मैलावर सामोर जाऊन मार्गप्रतिक्षा करत थांबले होते.व इतर लोक गांवापासून तेथपर्यंत दुतर्फा पसरले होते.

 श्रींचे लांबून दर्शन होतांच सर्वांनी एककंठाने जयघोष करण्यास सुरवात केली व त्यांस मिरवीत गावांत उभारलेल्या भाव्य मंडपात आणले.मंडपात मध्यभागी उंच सिंहासन तयार करण्यांत आले होते.त्यावर श्री विराजमान झाले. दर्शनोत्सुक जनसमुहाने अहमहमिकेने श्रींचे दर्शन घेतले.त्या दिवसापिसून श्रीरामरायाच्या घोषाला ना अंत ना पार अशी स्थिती झाली.भोजनाच्या पंक्तीवर पंक्ती उठूं लागल्या.सर्व ज्ञातीच्या लोकांना देखील मुक्तद्वार अन्नसंतर्पण चालू होते.श्रींच्या कडून अनुग्रह घेण्यासाठी तसेच प्रापंचिक दुःखे सांगून त्यावर इलाज विचारण्याची नुसती रीघ लागून राहिली.

 अशा प्रकारे त्या महोत्सवानंदात दोन दिवस गेले नाही तोच गावातील पाण्याच्या तलावांतील पिण्याच्या पाण्याचा सांठा कोठेच नव्हता.अशा स्थितीत ८/१० हजार लोकांना पाणी पुरवठा कसा करावयाचा. अखेर श्रीगुरुंपुढे त्यांनी आपली चिंता व्यक्त करताच ,"  मूर्तिमंत श्री हजर असतांना व श्रीरामनाम अहर्निश चालू असतांना, खुळ्यांनो कसली चिंता करता.पाण्याची कमतरता कशी भासेल". या शब्दांत त्यांचे समाधान श्रीगुरुंनी केले.आकाशाकडे कृपाकटाक्षाने पाहिले.व रोजच्या प्रमाणे अतिउत्साहाने श्रींची पूजा आरती करुन भोजनाची पंगत बसवली.संपूर्ण जेवणावळ आटोपली.आणि चमत्कार असा झाला की,आकाशांत इतके काळे ढग जमले की आकाशच दिसेना.अकस्मात भयंकर पावसास सुरवात झाली.क्षणार्घात पहावे तिकडे पाणीच पाणी दिसू लागले.तळे विहरी भरुन वाहू लागल्या.

 वास्तविक तो माघ महिना होता.पावसाचा यत्किंचित् संभव नव्हता आणि पावसाचे चिन्ह दिसत नसतांना श्रीगुरुंच्या महिम्याने पाण्याची समृद्धि झाली.हे केवळ श्रींचे ठायी असलेल्या ब्रह्मानंद गुरुंच्या दृढ विश्वासाचे फळ.या अद्भूत घटनेने तेथील लोकांचा उत्साह शतगुणित झाला असल्यास नवल ते काय ?

श्रींचा तेथे ८ दिवस मुक्काम होता.सर्वांची जेवणाची व्यवस्था होती.तेथे न जेवणाऱ्यांसाठी तांदूळ,डाळ वगैरे सामान देणाऱ्याचीही व्यवस्था असल्याने सर्वजण संतृप्त झाले होते.समारंभाच्या समाप्तीचे दिवशी ब्रह्मानंद गुरुंनी श्रींचे हस्ते जमलेल्या शेकडो विद्वानांना एकेक महावस्त्र व एकेक मोहोर दक्षिणा देववून त्यांची संभावना केली.व हजारो गोरगरीबांना अन्न,वस्त्र व द्रव्य देववून त्यांना आनंदित केले.अनेक लोकांना बीजमंत्राचा उपदेश श्रींचेकडून देवविला.


जय श्रीराम! 

फोटो स्रोत: गुगल

 जय श्रीराम! 

#श्रीमहाराजांचेज्येष्ठशिष्य

गोंदवल्याचे भूतपूर्व पंच मंडळी!

श्री गोपाळराव कर्वे 

श्री कर्वे १९५६ साली पंच झाले. हे कर्तृत्ववान आणि हुशार होते. शेतीची , बांधकामाची पूर्ण माहिती ते वाचन करून मिळवित आणि त्याचा उपयोग करून घेत. संस्थानाचे हिताविरुद्ध एखादी गोष्ट असल्यास ते तसे स्पष्ट सांगत. 

श्री रामकृष्ण दामले यांच्या अंत्यसमयी श्री गोपाळराव कर्वे हजर होते.

त्यांचेविषयी खालील दोन गोष्टी वाचनात आल्या. 

         सन १९६१ साली जुलै मध्ये पुण्याला पानशेतचा पूर आला. त्यामध्ये पुष्कळ कुटूंबे निराधार झाली. त्यात काही श्रीमहाराजांची अनुग्रहीत मंडळी होती. त्यांचा समाचार घेण्यासाठी श्रीमहाराज मुद्दाम पुण्यास आले होते. [वाणी अवतारात] त्यावेळी श्रीगोंदवले देवस्थानचे ट्रस्टी श्री कर्वे श्रीमहाराजांना भेटले. श्रीमहाराज त्यांना म्हणालेः

         गोपाळराव, ही जी पुण्यावर आपत्ती आली आहे ती दैवी आपत्ती आहे. त्यात कोठल्याही मानवाचा दोष अगर अपराध नाही. अशा दैवी आपत्तीने जी कुटूंबे निराधार व निराश्रित झाली असतील त्यांना टाहो फोडून सांगा की त्या सर्वांनी गोंदवल्यास येऊन राहावे. त्या सर्वांची आश्रयाची वा अन्नवस्त्रांची सोय जरुर करण्यात येईल. श्रीगोंदवल्यास जाण्यास द्रव्य सहाय्यही देण्यात येईल. त्यांनी फक्त श्रीगोंदवल्यास काय जाडेभरडे अन्न मिळेल त्यावर उपजिवीका करुन घ्यावी. व गोंदवल्यास राहिलेल्या काळात त्यांनी होईल तितके नामस्मरण करावे. हे सर्व तूम्ही अगदी माझा निरोप म्हणून टाहो फोडून सांगा. अशा आपत्ती मध्ये आपल्या मंदिराचा जर उपयोग झाला नाही तर त्या मंदिराचे कामच काय?*

         जेवढे लोक जातील ती माहिती मला कळवावी म्हणजे त्यांची व्यवस्था नीट लागते की नाही याची जिम्मेदारी माझ्यावर राहील. 

               *********

संदर्भः श्री बापूसाहेब मराठे यांचे हस्तलिखित

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

       १९६३ हें श्रीमहाराजांच्या पुण्यतिथीच्या सुवर्णमहोत्सवाचे वर्ष. त्यानिमित्तानें श्रीमहाराजांच्या समाधीमंदिरावरील शिखरावर सुवर्णकलशाची स्थापना करावी व त्याच्या पडझड झालेल्या भागांची दुरुस्ती करावी अशा विचारानें श्री. तात्यासाहेबांनीं व देवस्थानच्या पंचमंडळींनीं श्री. हुच्चराव व श्री. अंतरकर यांचेवर तें काम सोपविलें. त्यांनी तें श्री. अण्णासाहेब गाडगीळ यांचे सल्ल्यानें व मदतीनें कारागीर आणून प्रथम नादुरुस्त असलेलें शिखर दुरुस्त करून घेतलें. 

       ता. ४-११-१९६३ रोंजीं शिखरावर [मूळ तांब्याच्या कलशाला सोन्याचें पाणी दिलेल्या] सुवर्णकलशाची स्थापना केली. आदले रात्रीं तो प्रथम थोरले श्रीरामासमोर सभामंडपांत ठेवून मग तो समारंभपूर्वक समाधिमंदिरात आणला गेला. तेथें त्यावर दुधाचा रुद्राभिषेक केला गेला व दुसरे दिवशीं संस्थानाचे दुसरे ट्रस्टी  श्री. रा. गोपाळराव कर्वे यांचे हस्तें [ते शेवटपर्यंत पहाडावर चढून गेले होते.] त्याची प्रत्यक्ष स्थापना झाली. आदले दिवसापासून स्थापनेचें वृत्त गांवांत पसरलें असल्यामुळें हा स्थापनेचा सोहळा पाहण्यास जवळ जवळ सबंध गाव लोटलें होतें. *श्री. रा. तात्यासाहेबांना कार्यक्रमाकरता मुद्दाम बोलाविले होतें. प्रथम ते नाही म्हणत होते. पण नंतर कबुल झाले व आले.*

          मंदिराभोवती ब्रह्मवृंदांचा आणि भाविकांचा मेळा मोठ्या प्रमाणात होता. मंत्र घोष, वाद्ये, तुतारी वगैरेंच्या नादाने असमंत दुमदुमून गेले होते. त्याचवेळी श्रीमहाराजांचा सुखसंवाद [वाणीरुप अवतारात] सुरु होता. येथे असलेले स्त्री पुरुष तल्लीनतेने ती अमृतवाणी ऐकत होते. *बाहेरील आवाज वाढल्यामुळे महाराज थोडे थांबले. त्यांनी विचारले, 'बाहेर काय चालू आहे?' कोणीतरी सांगितले 'सुवर्ण कलश स्थापनेचा सोहळा सुरू आहे'. ते ऐकल्यावर महाराज शांतपणे म्हणाले, 'मंदिराला सोन्याच्या कळसापेक्षा उपासनेचा कळस असावा.'*

               *******

संदर्भः १] *मालाडचे थोर सत्पुरुष श्री रामचंद्र चिंतामणि तथा तात्यासाहेब केतकर यांचे जीवनचरित्र* हे डा वा रा अंतरकर यांनी लिहिलेले पुस्तक. २] धन्य ही गोंदवले नगरी ! हे वासुदेव पुंडलीक कुळकर्णी यांचे पुस्तक.

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

 जय श्रीराम! 

#बहुमंदिरेस्थापियेली 

आपण पाहत आहोत श्रीमहाराजस्थपित मंदिरे. 

३४.  कुक्कुडवाड राममंदिर १९१२-१३

मु.पो. कुक्कुडवाड, ता. माण, जि. सातारा, महाराष्ट्र

कुक्कुडवाड हे गोंदवल्यापासून २४ किमी वर असलेले श्रीमहाराजांच्या आज्जी राधाबाई यांचे गाव. तिथे श्रीमहाराज स्थापित राम मंदिर आहे.या मंदिराचा बहुधा १०० वर्षांनी जीर्णोद्धार झाला असावा.. या संदर्भात इथे फेसबुकवरच एक वेगळी कथा/ पोस्ट वाचनात आली. 

https://www.facebook.com/share/p/163m9CuBv8/

फोटो सोर्स - गुगल


 





 

 

 

 

 

 

 

 ३५.  शनिमंदिर, गोंदवले १९१३

गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र

श्रीमहाराजांनी १९११ साली धाकटे राम मंदिराजवळ श्रीदत्तात्रेयाची स्थापना केली. त्यानंतर श्री शनिदेवाची स्थापना झाली..

एका ज्योतिषाच्या सांगण्यावरून श्रींनी अतिशय सुबक, दरारा दाखवणारी, डोळ्यात तेज असणारी, काळयाकभिन्न रंगाची, वज्रासनात बसलेली श्री शनिदेवाची मूर्ती स्थापन केली.

श्रींच्या हृदयात सतत रामरायाचे चिंतन चालू असल्याने सर्व काळ व वेळ शुभच होता. त्यांच्या जीवनात ग्रहांना स्थान नव्हते. श्रीमहाराज नेहमी म्हणायचे की ग्रहांचा अधिकार फक्त शरीरापुरताच असतो. 

एकदा पंढरपूरचा एक ज्योतिषी श्रींच्या दर्शनाला गोंदवल्यास आला. श्रींची कुंडली पाहून त्यांनी श्रींना सांगितले, " महाराज आपल्याला साडेसाती आहे, काहीतरी करायला पाहिजे." त्यावर श्री म्हणाले," असेना का ती बिचारी, ती आपल्या मार्गाने जाईल!" त्यावर ज्योतिषी म्हणाला," महाराज, या भागात शनिदेवाचे कुठेही मंदिर नाही, आपण जर बांधले तर इतर अनेक लोकांची सोय होईल." 

तेव्हा श्री म्हणाले," तुम्ही म्हणता ते खरे आहे, मंदिर बांधायला माझी काहीच हरकत नाही, शनी हा देवांचा फौजदार आहे. शनीच्या दर्शनास इतर कोठे जाण्यापेक्षा आपण इथेच शनीचे मंदिर बांधावे." ग्रामस्थांना खूप आनंद झाला. दत्तमंदिराला लागून असलेली जागा श्रींनी शनिच्या मंदिराकरता ठरवली. अशा रीतीने श्रींची साडेसाती चालू असताना १९१३ साली शनीचे मंदिर बांधण्यात आले. त्यानंतर जवळजवळ ९० वर्षांनी म्हणजे २००२ मध्ये शनी मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले.

संदर्भ: चैतन्य स्मरण विशेषांक २००२


जय श्रीराम!

रविवार, ९ मार्च, २०२५

 जय श्रीराम!
#बहुमंदिरेस्थापियेली

आपण बघत आहोत श्री महाराज स्थापित मंदिरे 


३१. अंबामातामंदिर, गोंदवले १९११
गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र


श्रीदत्तांच्या एका बाजूस नृसिंहाची मूर्ती व एका बाजूस देवीची मूर्ती आहे. १९५९ च्या पुण्यतिथी उत्सवाच्या वेळी शतचंडी महायाग करण्यात आला व दत्तमंदिरात देवीची स्थापना करण्यात आली.

 

 

 

 

 

 

 

 ३२. कुरवली (सिद्धेश्वर) राममंदिर १९१२  कुरोली
मु.पो. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव, जि. सातारा - ४१५५२७, महाराष्ट्र

प. पू. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या शिष्यनामावलीतील महत्वाचे पण तसे अपरीचित नाव म्हणजे श्री संत दामोदर महाराज.आज त्यांची पुण्यतिथी. श्री दामोदर महाराजांनी  २४ वर्ष गोंदवल्यात प. पू. श्री. महाराजांची सेवा केली. श्रीमहाराजांनी त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला होता. श्रीमहाराज म्हणायचें कीं जो  नियमित नामस्मरण करील त्यांची अंगलट गुरुसारखी होईल. श्री दामोदरबुवा कुरवलीकर हे सुद्धा अगदी श्रीमहाराजांसारखेच दिसायचें. बेळगांव निवासी पू काणेमहाराज यांना अनुग्रह दामोदरबुआंनीच दिला होता.  श्री महाराजांच्याच आज्ञेवरून त्यांनी गोमेवाडी आणि सिद्धेश्वर कुरोली येथे प्रभू श्री रामरायांची स्थापना केली.  पू. श्री गोंदावलेकर महाराजांसोबत काशी अयोध्या यात्रेत सहभागी होण्याचे भाग्य त्यांना लाभले. महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवात काकडआरती नंतरच्या भजनाचे प्रमुख कुरवलीकर बुवाच असायचे.
















३३. दहिवडी राममंदिर १९१२
मु.पो. दहिवडी, ता. माण, जि. सातारा, ४१५५०३, महाराष्ट्र









 

 

 

 

 

 

 

 

 

जय श्रीराम

 जय श्रीराम!
#श्रीमहाराजांचेज्येष्ठशिष्य

गोंदवले संस्थानाचे पंच!

श्री दत्तात्रय विनायक खाडिलकर
यांचा पंच पदाचा कार्यकाळ ३०/६/१९३७ ते २८/१२/१९५४)

दत्तात्रय उर्फ दादासाहेब खाडिलकर हे उत्साही पंच होते. ते हसतमुख, उंच व गौरवर्ण होते. व्यक्तिमत्व प्रसन्न होते. ते उत्सवाची पंगतीची व्यवस्था बघत. वाढण्याकरता मंडळी कमी वाटल्यास खोल्यांतून बोलावून आणायचे. त्यांचे काळात रेशनमुळे धान्य मिळण्यास अडचणी, प्लेगमुळे उत्सवास बंदी, कलेक्टरच्या परवानग्या अश्या अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले.
**
 

 

 

 

 

 

*****

काशिनाथ नरहर (सरदार) कुलकर्णी, गिरवीकर
हे सुद्धा गोंदवल्याचे पंच होते. त्यांचा कार्यकाळ २१/१२/१९३९ ते १/४/१९६०


श्री. यशवंत नरहर कुलकर्णी उर्फ येसुकाका यांनी आपल्या बारा वर्षाच्या नातवाला पंढरपूरला शिक्षणासाठी ठेवले होते. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीचा परिणाम मुलाच्या मनावर झाला आणि तो परागंदा झाला. येसूकाका श्रीमहाराजांचेकडे गेले व त्यांनी सर्व हकिकत त्यांना सांगितली. श्रीमहाराज म्हणाले, 'काळजी करण्याचे काही कारण नाही, तुमचा नातू लवकरच सापडेल.' नातू माहुली येथे सापडला. येसुकाकांनी नातवाला लगेच श्रीमहाराजांकडे आणले. मुलाला पाहताच श्रीमहाराज म्हणाले, 'माझा नातू आला; पुरण पोळी करा.'

श्रीमहाराजांना नमस्कार करताच त्यांनी त्याला आपल्या जवळ बसवून त्याला उपदेशपर चार गोष्टी सांगितल्या व अनुग्रह दिला, आणि येसुकाकांकडे वळून ते म्हणाले, 'त्याचेकडे तुमचे घरातील कारभाराची किल्ली द्या; आता तो कोठे जाणार नाही.'
हा पळून जाणारा नातू म्हणजे कै. काशीनाथ नरहर कुलकर्णी उर्फ सरदार गिरवीकर. हे पुढे गोंदवले संस्थानचे पंच होते.
🌿 ~ चैतन्य - स्मरण १९८८ मधील  पंढरीनाथ काशिनाथ कुलकर्णी यांच्या लेखातून.
**

  जय श्रीराम!

 

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

 जय श्रीराम!

' बहू मंदिरे स्थापियेली ' या शृंखलेत पुढची मंदिरे आहेत.

२८. कऱ्हाड राममंदिर १९११
सोमवार पेठ, कऱ्हाड, जि. सातारा, ४१५११०, महाराष्ट्र
पुजारी : वासुनाना देव

श्रीमहाराज कर्‍हाडला वासुनाना देव व बापुराव चिवटे यांच्या विनंतीवरुन राममंदिराच्या स्थापनेसाठी गेले. त्यावेळी संकेश्वर मठाच्या शंकराचार्यांचा मुक्काम तेथे होता. रामाच्या स्थापनेचा मुहूर्त चागला नव्हता असे शंकराचार्यांच्या ज्योतिषांनी श्रींना सांगितले, त्यावर श्री म्हणाले, " असे कसे होईल, मी अज्ञ, पण राम असे होऊ देणार नाही, तरी आपण पुन्हा पंचांग बघावे" त्यावर जोतिषाने पंचांग पाहून गणित मांडले, तेव्हा तो स्वत:च चकित  झाले. शुभ मुहूर्तापैकी तो एक मुहूर्त निघाला. श्रींनी स्वामींच्या सर्व परिवारास राममंदिरात भोजनास बोलावले. स्वामींच्या विनंतीवरुन श्रींनी स्वामीणी हत्तीचे दान देण्याचा संकल्प सोडला व म्हणाले, " कोणालाही सांगून हत्ती आणावा, माझ्याकडे किंमत तयार आहे,; तोपर्यंत मठाला एक कालवड देतो, तिचा स्वीकार करावा."

कऱ्हाड येथील श्रींच्या चरित्रात अजून एक आलेला उल्लेख म्हणजे,
कऱ्हाडला आबाजीपंत नावाचे एक गृहस्थ होते.रजिस्ट्रेशन खात्यामध्ये त्यांनी बरीच वर्षे नोकरी केली,.त्यांना मुलगा नव्हता, फक्त मुलीचं होत्या,सर्व मुलींची लग्न झाली,फक्त धाकटी विठाबाई फारच लहान असल्यामुळे तीचे लग्न होऊ शकले नाही.पण आबांनी लवकर पेंशन घेतले, उरलेला काळ भगवंताच्या उपासनेत घालवण्याचा निश्चय केला,त्यांनी हा निश्चय केला खरा पण उपासना म्हणजे काय,ती  कशी करायची असते,भगवंताचा व आपला संबन्ध कशा प्रकारचा आहे,आत्मनिवेदन कसे करावे,इ प्रश्न त्यांना गोंधळात टाकीत,व त्यांची चित्तवृत्ती द्विधा होऊन जाई,म्हणून खरा परमार्थ सांगणारा कोणी योग्य मार्गदर्शक आपल्याला मिळेल काय या विवंचनेमध्ये  आबा होते.

मनाच्या अशा अवस्थेमध्ये ते श्री समर्थांची प्रार्थना करीत, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याची त्यांना विनंती करीत,असे दिवस चालले असता एके दिवशी एक वृद्ध रामदासी भिक्षेसाठी त्यांच्याकडे आले,त्यांना घरात बोलावून आबांनी त्यांचा सत्कार केला आणि" परमार्थ कसा करावा हे आपण मला सांगाल काय?" असा प्रश्न विचारला,रामदासी बुवांनी लगेच उत्तर दिले,"ते सांगण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो,गोंदवल्यास श्री महाराजांकडे तुम्ही जा म्हणजे तुमचे सर्व प्रश्न सुटून तुमचे खरे समाधान  होईल " असे सांगून ते लगेच निघून गेले.आबांनी श्री महाराजांचे नाव ऐकलेलं होतच,एक दोन दिवसांनी ते सहकुटुंब गोंदवल्यास आले,ते आले तेव्हा महाराज शेतातून काम करून येऊन,हात पाय मातीने भरलेले असे, स्नानाची वाट पहात उभे होते.
श्री महाराजाना पाहिल्याबरोबर आबांच्या मनाचे एकदम अतोनात समाधान झाले आणि प्रेमाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
दुसऱ्या दिवसा पासून श्री महाराज निरूपण सांगण्यासाठी बसू लागले.मंदिरातील बहुतेक सर्व स्त्री पुरुष निरूपण ऐकण्यासाठी बसत,त्यांच्यामध्ये आबा देखील मुकाट्याने एका बाजूला बसून मनापासून ऐकत,पहिल्या दिवशी*भगवंत म्हणजे कायआपला आणि त्याचा संबंध काय आहे,या विषयावर निरूपण झाले,आबांना वाटले आपल्याला जो विषय हवा होता तो सहजच निघाला असेल,श्री महाराजांनी निरुपणात जे विवेचन केले त्याच्यावर त्यांच्या मनामध्ये अनेक शंका उत्पन्न झाल्या,परंतु गोंदवल्यास ते अगदी नवीन असल्यामुळे त्यांना आपल्या मनातले विचार कोणाजवळ बोलून दाखवता येईनात.श्री महाराजांना सांगणे तर दुरच राहीले,दुसरे दिवशी निरुपणाला प्रारंभ करतानाच श्री महाराज बोलले" काल जो विषय झाला त्याच्यावर माझ्या मनामध्ये नंतर काही शंका आल्या त्यांचीच आज उत्तरे देऊ." असे बोलून त्यांनी आबांची एकेक शंका मांडली.आणि त्याची उत्तरे दिली. लागोपाठ चार दिवस हा प्रकार चालला,आबांच्या मनामध्ये ज्या ज्या शंका होत्या,त्या सर्व समाधानकारक
रीतीने सुटल्या.पाचवे दिवशी ,भक्तीमध्ये भगवंताच्या प्रेमाचा परिपोष कसा होतो,आणि ती भक्ती नामाने कशी साधते,याचे वर्णन श्री महाराजांनी सुरू केले.सर्व मंडळी अगदी रंगून गेली होती,इतक्यात आबांना आपला भाव अनावर होऊन ते मध्येच उठले,आणि सद्गगतीत होऊन त्यांनी श्री महाराजाना साष्टांग नमस्कार घातला.श्री महाराजांनी त्यांना उचलून पोटाशी धरले,आणि शांत केले,तेव्हा आबा म्हणाले"महाराज!मी आज धन्य झालो.माझ्या सर्व शंका फिटल्या.पण माझी एक इच्छा आहे.माझ्या अंतकाळी असेच आपले दर्शन होईल काय? "श्री महाराजांनी तात्काळ उत्तर दिले"आबा,तुम्हाला दर्शन होईल इतकेच न्हवे ,तर त्याची साक्ष इतरांना देखील पटेल!"
 काही दिवस लोटल्यानंतर एके दिवशी श्री महाराजांनी
त्यांना विचारले,"आबा,भगवंताच्या नामात आहात ना? "आबा बोलले," होय महाराज पण माझ्या विठाबाईची मला काळजी वाटते ती अजून लहान आहे,.ती अजून लहान आहे,तिचे लग्न कसे होईल असे वाटते"यावर श्री महाराज म्हणाले" मी तिला दत्तक घेतो आजपासून ती माझी मुलगी आहे असं समजा,आणि तुम्ही अगदी निर्विकल्प मनाने नाम घ्या."त्या प्रमाणे  विठाबाईला श्री महाराजांच्या पदरात घालून आबा प्रपंचाच्या काळजीतून मुक्त झाले.इतपर त्यांचा सर्व काळ नामस्मरणा मध्ये जाऊ लागला.आणखी थोडे दिवस गेल्यावर आबांनी कऱ्हाड ला परत जाण्याबद्दल विचारले तेव्हा श्री महाराज म्हणाले," आताच काय घाई आहे?पुढे बघू."त्यावर त्यांनी "जाऊ का?" म्हणून पुन्हा विचारल्यावर श्री महाराजांनी संमती दिली आणि आबा कऱ्हाडला गेले.
श्री महाराजांचे लक्षात ठेवण्या सारखे एक मोठे वैशिष्ट्य असे होते की कोणी त्याना प्रश्न विचारल्यानंतर प्रथम चटकन जे उत्तर त्यांच्या तोंडून येई तेच त्यांचे खरे सांगणे,किंवा खरे मत किंवा खरी आज्ञा असे.त्यावर शंका काढून किंवा अडचणी दाखउन पुन्हा विचारले म्हणजे ते विचारणाऱ्याच्या मनाप्रमाणे सांगत.आबांनी त्यावेळी कऱ्हाड ला परत जाणे श्री महाराजांच्या
मनात नव्हते .परंतु एकदा नको म्हणून सांगितले असता पुन्हा विचारल्यावर मात्र त्यांनी होकार दिला.आबा कऱ्हाडला परत गेले,आणि सहा दिवसांनीच त्यांची प्रकृती बिघडण्यास आरंभ झाला.औषध पाणी व्यवस्थित चालू होते तरी पंधरा दिवसाच्या अवधीत ते इतके थकले कि त्यांना अंथरुणावरुन उठवेना,पण त्यांचे नामस्मरण सारखे चाललेले असून ते मनाने अगदी शांत होते,'श्री महाराजाना पत्र लिहून कळवावे का? 'असे विचारता ते नको म्हणाले,म्हणून गोंदवल्यास त्यांच्या आजाराची कोणास वार्ता न्हवती, एके दिवशी सकाळी त्यांची अवस्था फारच कठीण झाली, आणि त्यांचा अंतकाळ जवळ आला आहे हे सर्वांना समजले,स्वतः त्यांनाही तसे वाटले. श्री महाराज त्यावेळी गोंदवल्यास होते,सकाळी नऊ साडे नऊ ची वेळ,काही कारण नसताना ते रामासमोर भजनाला उभे राहिले .सर्व मंडळी" जय जय श्रीराम जय जय श्रीराम"असा घोष करून नाचत होती,इकडे कंठी प्राण आणून आबा श्री महाराजांची वाट पहात होते,इतक्यात ते ज्या खोलीमधे निजले होते,तिच्या पाठी मागच्या बाजूस*"जय जय श्रीराम"*असा श्री महाराजांचा स्पष्ट आवाज आणि त्याबरोबर मंडळींचाही आवाज सर्वाना ऐकू येऊ लागला,तेव्हा श्री महाराज
खरोखरच आले असे वाटून खोलीमधली इतर मंडळी त्यांचे स्वागत करण्यास एकदम उभी राहिली,आबांना बाह्यशुद्धी फारशी नव्हती ,परंतु तेवढ्यात ते चांगले शुद्धीवर आले,खाडदिशी उठून उभे राहिले,आणि"अरे,बघा! श्री महाराज स्वतः आले आहेत , सर्वानी त्यांचे दर्शन घ्या,! " असे बोलून व नमस्कार करून पुन्हा निजले,पाच मिनिटांनी डोळे उघडून पुन्हा ते बोलले"महाराज!आपण मला दर्शन दिले, माझ्या सर्व इच्छा पुरवल्या,मी आनंदाने निरोप घेतो" हे शब्द बोलून त्रयोदक्षाक्षरी मंत्राचा जप करीत शांतपणे त्यांनी प्राण सोडला
श्री महाराजांच्या कानावर हा सगळा प्रकार गेला तेव्हा ते अत्यन्त कौतुकाने म्हणाले,"आबा चांगले अधिकारी! रामाने त्यांना उत्तम गती दिली,भगवंताच्या नामाला त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते,असे लोक फार थोडे, त्यांनी आपला प्रपंच रामाला अर्पण केल्यावर त्याची कधी काळजी केली नाही, सर्वानी त्याचे अनुकरण करावे"
आबांच्याकडुन दत्तक घेतलेली मुलगी जी विठाबाई तिचे लग्न श्री महाराजांनी वासुदेव मार्डीकर नावाच्या गृहस्थाशी सालंकृत कन्यादान करून स्वतः करून दिले
**
२९. दत्तमंदिर, गोंदवले १९११
गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र

धाकट्या राममंदिराजवळच श्री दत्त मंदिर आहे.या एकमुखी दत्तमंदिराची स्थापना वैशाख शुद्ध पंचमी शके १८३३ (१७ मे १९११) रोजी झाली. दत्तात्रेयाची मूर्ती लहान असली तरी रेखीव आहे.श्रीदत्तांच्या एका बाजूस नृसिंहाची मूर्ती व एका बाजूस देवीची मूर्ती आहे. #१९५९च्या_पुण्यतिथी_उत्सवाच्या वेळी शतचंडी महायाग करण्यात आला व दत्तमंदिरात देवीची स्थापना करण्यात आली. १९९३ मध्ये या देवळाचा जीर्णोद्धार करताना समोर मोठा सभामंडप बांधण्यात आला.

**
 

 

 

 


 


 

 

 

 

 

 

 


 

 

 

३०. नृसिंहमंदिर, गोंदवले १९११
गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र

श्रीमहाराजांचे कुलदैवत नृसिंह. त्यामुळे नृसिंह दैवताची स्थापना ही साधारण त्याच वर्षी म्हणजे १९११ मध्ये झाली.
**
 

 

 

 

 

 

जय श्रीराम

 श्रीमहाराजांचे काही ज्येष्ठ साधक

श्री अण्णासाहेब मनोहर

इ.स. १९२० मध्ये श्रीमहाराजांचे इंदोर येथील महान अधिकारी शिष्य श्री भैय्यासाहेब मोडक पुण्यात श्री वासुदेवराव फडके यांच्याकडे काही दिवस राहत होते. तिथे ते दररोज रात्री तुलसीदास रामायण सांगत असत. त्याचबरोबर श्रीमहाराज पूर्वी इंदोर येथे असतांना त्या गोष्टी हि अत्यंत प्रेमाने सांगत असत. हे ऐकण्यास पुण्यातील एक मॅकेनिकल इंजिनियर श्री अण्णासाहेब मनोहर जात असत. भैय्यासाहेबांच्या सांगण्याचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला कि श्रींना भेटावे असे त्यांना वाटू लागले. श्रींनी देह ठेवल्यास तोवर त्यांना माहित नव्हते. एक दिवस त्यांनी भैयासाहेबांना विचारले. आणि जेव्हा ते देहात नाहीत असे कळले तेव्हा त्यांना फार दुःख झाले आणि आता श्रीमहाराजांचे दर्शन मला कसे होईल याचा त्यांना रात्रंदिवस ध्यास लागला. तसे ते वरचेवर भैय्यासाहेबांना विचारत असत. एक दिवस भैय्यासाहेबांनी त्यांस जवळ घेऊन सांगितले की, श्रीमहाराजांस काय आवडत होते व ते कशात आहेत ते तुम्ही केले तर श्रीमहाराज तुम्हास भेटतील असा माझा भरवसा आहे. पुढे म्हणाले, कि श्रीमहाराजांस श्रीरामनामाचे अत्यंत प्रेम आहे. तरी तुम्ही त्याचा होईल तितका जप करीत जा. श्रीमहाराज तुम्हाला दर्शन देतील.असे सांगितल्यावर श्री अण्णासाहेबांनी निश्चय करून श्रींच्या भेटीची अपेक्षा ठेवून दररोज पहाटे ४ वाजता उठून अंघोळ वैगेरे आटोपून सकाळी सात वाजेपर्यंत जप करून ते कामावर जात असत.असा क्रम सुमारे पाच वर्षे चालला होता. ते अत्यंत भाविक, श्रद्धाळू, आणि चिकाटीने वागणारे होते.
पु. तात्यासाहेब केतकर म्हणतात, त्यांची खरी तळमळ श्रींचे आगमनास कारण झाली यात शंकाच नाही.

एकदा रा.अण्णासाहेब मनोहर यांस शंभर रुपयांची गरज पडली. त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांचेकडे शंभर रुपये नक्की होते, पण त्यांनी जेथे ते पैसे ठेवीत त्या पेट्या कपाटे सर्व शोधूनही कोठे सापडले नाहीत. ते फार अस्वस्थ झाले. दुसरे दिवशी सकाळला ते पाहिजे होते. सकाळी काही कामाकरिता ते कपाट उघडतात तो समोरच शंभर रुपयांची एक नोट पडलेली दिसली. ती दिसताच त्यांना श्रींची आठवण झाली. मन अस्वस्थ झाले हे बरे नाही असे त्यांना वाटले. श्रीमहाराज तेथे गेल्यावर त्यांनी ती नोट श्रींपुढे ठेवून सर्व हकीकत सांगितली. श्रींनी ती नोट त्यांना परत देऊन म्हटले,'असल्या हलक्यासलक्या कारणासाठी मन अस्वस्थ होणे बरे नाही. श्रीराम इच्छेने सर्व घडते ही भावना ठेवून वागावे'.

अण्णासाहेबांची मुलगी सुंद्राताई अकोल्यास रहात असे. ती फारच आजारी असल्याची तार आल्यामुळे श्री.अण्णासाहेब मंडळीसह अकोल्यास जाण्यासाठी निघून वाटेत श्री.गोंदवलेकर महाराजांकडे (वाणी अवतार) दर्शनासाठी आले. श्रींनी त्यांना अंगारा दिला व तिला आशीर्वाद सांगण्यास सांगून त्यांस निरोप दिला. ते तिथे पोहोचले तेव्हा सुंद्राताई श्वास लागलेल्या स्थितीत होती. त्यांनी तिला अंगारा लावून श्रींचे आशीर्वाद सांगितले. ती थोडावेळ शुद्धीत आली. आईवडिलांना पाहून तीला आनंद वाटला. ती म्हणली " यांतून मी वांचेन असे दिसत नाही." त्यावर अण्णासाहेब म्हणाले श्रीनी "बरे वाटेल" असे सांगितले आहे. थोड्याच वेळात ती बेशुद्ध झाली. अशा अवस्थेत ती सुमारे एक तास होती. सर्वांची आशा सुटलीच होती.   पण नंतर तिने डोळे उघडले व ती रडू लागली. तेव्हा श्री.अण्णासाहेब म्हणाले "असे काय करतेस ? रडू नये" ती म्हणाली "काय सांगू तुम्हाला मी " कितीतरी आनंदात होते.पण खाली येऊन दुःखात पडले" व पुढे सांगू लागली " माझी शुद्ध नाहीशी झाली तशी मी वर वर जाऊ लागले. सात डोंगर चढल्याचे वाटले. तेथे एक मोठा हॉल होता.त्यामध्ये मोठी तेजपुंज मंडळी बसली होती. मला कोणीतरी मध्ये उभे केले. त्या मंडळीतच श्रीमहाराज बसले होते, ते म्हणाले "हिला कोणी आणले ? हिची वेळ अजून झाली नाही. तिला खाली नेऊन पोहोचवा.मी नमस्कार केला. त्या लोकांनी मला खाली आणले आणि मी सावध झाले.मी फार आनंदी वातावरणात होते." थोडे दिवसांनी तिची प्रकृती सुधारली. श्री.अण्णासाहेबांनी ही हकीगत पुण्यात आल्यावर श्री.महाराजांना सांगितली.

शेवटी शेवटी अण्णासाहेब वाताच्या झटक्याने आजारी पडले. अंथरूणाला खिळून होते. औषधपाणी चालू होते.त्यांची व्रुत्ती अगदी शांत होती. त्याच वेऴी श्रीक्षेत्र काशीस जाण्यासंदर्भात बोलाचाली चालू होत्या.श्रीमहाराज प्रत्यक्ष या संदर्भांत त्यांच्याशी बोलले नाहीत. पण श्रींचे बोलणे त्यांस ऐकू येत होते. त्यावर्षी गोंदवल्याचा उत्सव दि.१२/१२/१९३३ रोजी होता. श्रींनी गोंदवल्यास जावे असा श्री अण्णासाहेबांचा आग्रह होता.ते श्रींना म्हणाले "आपण नाही गेलात तर पुष्कळांना बरे वाटणार नाही.लांबची मंडळी येतात.तरी आपण जावे." त्या प्रमाणे जाण्याचे ठरले. श्रींनी त्यांना भेटून सांगितले की " अण्णासाहेब धीर सोडू नका.प्रारब्धाने आलेला भोग श्रीरामक्रुपेने दुर होईल." काही काळ दोघांसही बोलवेना. श्री म्हणाले "तुमची प्रक्रुती बरी झाल्याशिवाय मी काशीयात्रेला जाणार नाही.तुम्ही आलात तर मी जाईन." गोंदवल्यास उत्सवास जाण्याचे ठरले. श्री.अण्णासाहेबांच्या मंडळींना गोंदवल्यास येता येईना त्यांचे वाईट वाटले.श्री.त्यांना म्हणाले आपण वाईट वाटू देऊं नका; तुम्ही त्या वेळी तेथे जाल (गोंदवले येथे). याचा अर्थ त्यांना काहीच कळेना. उत्सव आनंदात चालला होता. पण श्री अण्णासाहेबांच्या अनुपस्थतींतीचा सर्वांवर परिणाम झालेला दिसला. अगदी गुलाल उधळण्याचे वेळी पुण्यांत श्री.अण्णासाहेबांचे मंडळीस डोळा लागला होता. त्याच वेळी घंटेचा आवाज त्यांनी ऐकला.जांगे होऊन डोळे उघडून पाहतात तो त्यांस श्रींच्या समाधींचे दर्शन झाले.त्यांस आनंद झाला. लगेच श्रीऩीं सांगितलेल्याची आठवण झाली.

शेवटी यांना अर्धांग झाला असतां एकाने विचारलें, महाराजांनी हें असें कसें केलें असें तुमच्या मनांत येत असेल, नाहीं? त्यांच्या डोळ्यांत खळकन पाणी आलें.ते म्हणाले, छे, छे, ! हा विचार माझ्या मनाला  शिवलासुध्दां नाहीं माझ्या प्रारब्धानें हा आजार आला, पण त्यामध्येसुध्दां माझें नाम पूर्वव्रत चालू आहे, ही महाराजांची खरी कृपा होय.

जय श्रीराम !
संकलन - श्रीमहाराज कन्या

जय श्रीराम! . आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे. १३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२ ह...